भुसावळ तालुक्यात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग : आरोपीला अटक
Minor girl assaulted in Bhusawal taluka: Accused arrested भुसावळ : शहराला लागून असलेल्या एका गावातील अल्पवयीन मुलीला घरी नेत तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न झाल्याची संतापजनक घटना सोमवारी दुपारी एक वाजता घडली. या प्रकरणी संशयिताविरोधात भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली.
घरात पीडीतेला नेत केला अतिप्रसंग
पीडीतेची 35 वर्षीय आईने दिलेल्या फिर्यादीनुसार सोमवारी दुपारी आरोपी विजय उर्फ काल्या रामधन पारधी (तालुका भुसावळ) याने पीडीतेला तिच्या घरी नेत तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. या प्रकारानंतर पीडीतेने आरडा-ओरड केल्यानंतर ग्रामस्थ जमा झाले. भुसावळ तालुका पोलिसांना माहिती कळवल्यानंतर पर्यवेक्षाधीन पोलीस उपअधीक्षक सतीश कुलकर्णी, सहाय्यक निरीक्षक अमोल पवार यांनी धाव घेत घडला प्रकार जाणून घेतला. संशयिताविरोधात पोस्कोन्वये गुन्हा दाखल केल्यानंतर त्यास अटक करण्यात आली. संशयिताला मंगळवारी भुसावळ सत्र न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची (22 जून) पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

