आमोदा गावातून चोरट्यांनी दुचाकी लांबवली


यावल : यावल तालुक्यातील आमोदा गावातून बांधकाम सुरू असलेल्या घराबाहेर लावलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने लांबवली. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर फैजपूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा
आमोदा, ता.यावल येथील फिरोज रशीद तडवी यांच्या घराचे बांधकाम सुरू असताना त्या ठिकाणी मिस्त्री काम करणारे रईस रशीद पिंजारी (तहा नगर, फैजपूर) हे दुचाकी घेऊन आले होते व बांधकाम सुरू असलेल्या घरासमोर त्यांनी दुचाकी (क्रमांक एम.एच.19 बी.एस. 7083) ही लावली असता अज्ञात चोरट्याने त्यांची दुचाकी लांबवली. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर रईस पिंजारी यांनी फैजपूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध तक्रार दिल्यानंतर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहायक पोलीस निरीरक्षक निलेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक बाळू भोई करीत आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !