सांगवी बुद्रुक शेत शिवारातून इलेक्ट्रिकल मोटर चोरी
यावल : तालुक्यातील सांगवी बुद्रुक या गावातील शेतात असलेली तीन एच.पी.ची इलेक्ट्रिकल मोटार अज्ञात चोरट्यांनी चोरी करून केली. हा प्रकार सकाळी निदर्शनास आला तेव्हा याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
अज्ञाताविरोधात गुन्हा
सांगवी बुद्रुक, ता.यावल येथील शेतकरी गिरीश भास्कर कोळंबे यांचे सांगवी शिवारात शेत गट क्रमांक 822 आहे. यामध्ये त्यांनी शेताच्या बांधावर तीन एच.पी.ची मोटर ठेवली असता मध्यरात्रीनंतर अज्ञात चोरट्यांनी पाच हजार रुपये किंमतीची मोटार लांबवली. हा प्रकार सकाळी निदर्शनास आल्यानंतर गिरीश कोळंबे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध यावल पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक संदीप सूर्यवंशी करीत आहे.

