मुक्ताईनगरात निर्माल्यातून सेंद्रिय खत निर्मिती


मुक्ताईनगर शहरातील नवयुवकांच्या अभिनव संकल्पनेचे सर्वत्र स्वागत

मुक्ताईनगर : तीर्थक्षेत्र श्री संत मुक्ताई मंदिर व मुक्ताईनगर परीसरातील विविध देवस्थानची मंदिरे यातून प्लॅस्टिक मुक्त निर्माल्य संकलन करीत त्यापासून चांगल्या दर्जाचे सेंद्रिय खत निर्मिती करण्याचा अभिनव उपक्रम काही नवयुवकांनी हातात घेतला आहे. तो यशस्वीपणे याबविला जावा याकरीता विविध मंदिरात प्लॅस्टिक मुक्त कचरा स्वीकारण्यासाठी निर्माल्य संकलन पेट्या तयार करून त्या मंदिर व्यवस्थापकाच्या स्वाधीन करण्यात आल्या आहेत

या युवकांच्या संकल्पनेतून खत निर्मिती
निर्माल्यातून उच्च दर्जाचे सेंद्रिय खत निर्मिती करण्यासाठी सचिन बोरोले, धनंजय सापधरे, राहुल माळी, शुभम तळेले, शुभम काठोके, मंगेश कोळी, अनिल भंगाळे हे नवयुवक प्रयत्नशील असून त्यांच्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमास अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.




या मंदिरात दिल्या निर्माल्य संकलन पेट्या
विठ्ठल मंदिर -सुनील पाटील, नवीन मुक्ताई मंदिर- हभप रवींद्र हरणे, राम मंदिर- शेखर सबनीस, हनुमान मंदिर- एकनाथ कोळी, रेणुका मंदिर- प्रशांत नाईक, गजानन महाराज मंदिर- आधार पाटील, जागृत हनुमान मंदिर- आझादगिरी महाराज, हनुमान मंदिर शिरसाळा- प्रल्हाद धनगर, जुने मुक्ताई मंदिर- उद्धव जुनारे. या दरम्यान, या मंदिरात संबधीत कामकाज पाहणार्‍या व्यवस्थापकांकडे निर्माल्य संकलन पेट्या देण्यात आल्या आहेत.

या मंदिरातून निर्माल्य संकलन होणार
जुने कोथळी मुक्ताई मंदिर, नवीन मुक्ताई मंदिर, मेहुण मुक्ताई मंदिर, चांगदेव महाराज मंदिर, श्रीराम मंदिर, हनुमान मंदिर, रेणुका मंदिर, जागृत हनुमान मंदिर, हनुमान मंदिर, शिरसाळा, भवानी मंदिर, जुनेगाव, विठ्ठल मंदिर, जुने कोथळी


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !