Today in Jalgaon, in the presence of the Chief Minister, the ‘Government Aya Dari, Yojana Kalyankari’ program जळगावात आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ‘शासन आपल्या दारी, योजना कल्याणकारी’ कार्यक्रम
Today in Jalgaon, in the presence of the Chief Minister, the ‘Government Aya Dari, Yojana Kalyankari’ program जळगाव : शहरात शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचे आयोजन मंगळवार, 27 जून रोजी दुपारी तीन वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पोलीस कवायत मैदानावर करण्यात आले आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ लाभार्थींना कार्यक्रमात दिला जाणार आहे शिवाय विविध कल्याणकारी योजनांची माहितीदेखील यावेळी दिली जाणार आहे. उपस्थितीचे आवाहन जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी केले आहे.
अडीच लाख लाभार्थींना लाभ
15 एप्रिलपासून योजनांचा लाभ लाभार्थींना देण्यात येत असून आतापर्यंत दोन लाख 53 हजार 124 लाभार्थींना योजनांचा लाभ दिला जात आहे. या पैकी सुमारे 35 हजार लाभार्थी या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.

यांची कार्यक्रमास उपस्थिती
या कार्यक्रमाला पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री गिरीश महाजन, खासदार उन्मेश महाजन, खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे, आमदार चिमणराव पाटील, आमदार किशोर पाटील, आमदार मंगेश चव्हाण, चोपडा आमदार लता सोनवणे, आमदार चंद्रकांत पाटील आदींसह जिल्हाधिकारी अमन मित्तल, पोलीस अधीक्षक एम.राजकुमार आदींची उपस्थिती राहणार आहे. उपस्थितीचे आवाहन करण्यात आले आहे.
