If Eknath Khadse had not buried his face in the ground, it would not have been time to show the flags: Deputy Chief Minister Devendra Fadnavis एकनाथ खडसेंनी जमिनीत तोंड काळे केले नसते तर झेंडे दाखवण्याची वेळ आली नसती : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
If Eknath Khadse had not buried his face in the ground, it would not have been time to show the flags : Deputy Chief Minister Devendra Fadnavis जळगाव एकनाथ खडसे यांनी जमिनीत तोंड काळे केले नसते तर आज ते परीवारात राहिले असते, अशी कणखर टिका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे मंगळवारी दुपारी माध्यमांशी बोलताना केली. मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्याच्या प्रश्नावर ते बोलत होते. फडणवीस व खडसे यांच्यातील सख्य संपूर्ण राज्याला ठावूक असतानाच आता फडणवीसांनी थेट खडसेंवर जमिनीबाबत आरोप केल्यानंतर राज्यातील नव्या वादाला आता तोंड फूटले आहे.
काय म्हणाले फडणवीस
मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा दिल्याच्या प्रश्नावर फडणवीस म्हणाले की, काळे झेंडे दाखवून काय उपयोग होणार आहे. मूळात पोलिसांनी कुणाचीही धरपकड करू नये, असे मला वाटते. खडसेंना नवीन मालक मिळाला आहे, नवीन मालकाने सांगितले तसे ते वागत आहे. जमिनीत त्यांनी तोंड काळे केले नसते तर ते परीवारात (भाजपा) राहिले असते. अशा काळ्या झेंड्यांना आम्ही घाबरणार नाही. आम्ही जनतेचे लोक आहेत, जनता आमच्यासोबत आहे.

सांगाडे बाहेर निघतील म्हणूनच विरोधक एत्र
पंतप्रधान मोदींनी विरोधकांवर भ्रष्टाचाराचा आरोप केला असून महाराष्ट्रात 70 हजार कोटींचा भ्रष्टाचार केल्याचे ते म्हणाले आहेत. ही सगळी मंडळी का एकत्रीत आली याबाबत स्पष्टीकरण देताना फडणवीस म्हणाले की, विरोधक एकत्र येण्याचे कारण त्यांनी केलेले घोटाळे हे आहेत. आपले सांगाडे बाहेर निघतील म्हणूनच विरोध एकत्र आले आहेत. भारतातील व महाराष्ट्रातील जनतेचा मोदींवर विश्वास असल्याचे ते म्हणाले.
