उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच म्हणाले ; जळगाव शहर खड्डे मुक्त करा हवे तर काँक्रिट रस्ते करा


Deputy Chief Minister Devendra Fadnavis clearly said; Jalgaon city should free potholes, if necessary make concrete roads जळगाव : जळगावातील शहरात रस्त्यांबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासन आपल्या दारी कार्यक्रमात मोठे विधान केले. ते म्हणाले की, जळगाव शहरात शक्य असतील तितके रस्ते काँक्रीटचे करा, आपल्याकडे आता काम करण्याची चांगली संधी असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
शासन आमच्या दारी या कार्यक्रमांतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जळगावात मंगळवारी आले होते. व्यासपीठावर पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री गिरीश महाजन, मंत्री दादा भुसे, मंत्री अब्दुल सत्तार व जिल्ह्यातील आमदार व खासदार उपस्थित होते.

लवकरच कामे मार्गी लावण्याच्या सूचना
जळगाव शहरासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शंभर कोटींचा निधी दिला आहे. या निधीतून जळगाव शहरातील रस्ते चकाचक खड्डे मुक्त होणार आहेत. मागच्या वेळेस आपणही निधी दिला, मात्र सरकार बदललं. मात्र आता शहरातील रस्ते करण्याची चांगली संधी आपल्याकडे आहे. यावेळी त्यांनी मंत्री गुलाबराव पाटील व मंत्री गिरीश महाजन यांचे नाव घेत लवकरात लवकर कामे मार्गे लावा शहरातील बहुसंख्य रस्ते हे काँक्रिटचे करून शहर खड्डेमुक्त करा, अशा सूचनाही केल्या.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !