Deputy Chief Minister Devendra Fadnavis सिंचनासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही : जळगावात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही
We will not allow shortage of funds for irrigation: Deputy Chief Minister Devendra Fadnavis testified in Jalgaon जळगाव : जळगाव जिल्ह्यातील निम्न तापी पाडळसे प्रकल्पास सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात येईल. बोदवड उपसा सिंचन योजनेचे बाकी राहिलेले 20 टक्के काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल. जिल्ह्यातील अनेक प्रकल्पांना गती देण्यात येईल. सिंचनासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिली. पोलीस कवायत मैदानावर आयोजित शासन आपल्या दारी कार्यक्रमात ते बोलत होते.
यांची व्यासपीठावर उपस्थिती
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील, वैद्यकिय शिक्षण, ग्रामविकास, क्रीडा मंत्री गिरीष महाजन, कृषीमंत्री अब्दुल सत्तार, बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे, खासदार रक्षा खडसे, खासदार उन्मेष महाजन, आमदार सर्वश्री चिमणराव पाटील, आ.सुरेश भोळे, आ.किशोर पाटील, आ.संजय सावकारे आ.लता सोनवणे, आ.चंद्रकांत पाटील, आ.मंगेश चव्हाण, माजी आमदार स्मिता वाघ, चंदुलाल पटेल, शिरिष चौधरी आदी यावेळी उपस्थित होते.

50 हजार शेतकर्यांना पीक विमा योजनेचा लाभ
उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मागील वर्षभरात जिल्ह्यात 20 हजार हेक्टर शेती क्षेत्रावर ठिंबक सिंचनाचा लाभ देण्यात आला. याचा 21 हजार शेतकर्यांना लाभ झाला. 50 हजार शेतकर्यांना पीक विमा योजनेचा लाभ देण्यात आला. एक हजार ट्रॅक्टर वाटप करण्यात आले. रस्ते कामांकरीता जिल्ह्याला अडीच हजार कोटींची मदत शासनाने केली आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक कांदा चाळ जळगाव जिल्ह्यात उभारण्यात आल्या. जलजीवन मिशनच्या 1354 योजना जिल्ह्यात सुरू आहेत. फळबाग योजना व नैसर्गिक आपत्तीत जळगाव जिल्ह्याला भरघोस मदत करण्यात आल्याचेही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
