…तर तुम्ही 40 वर्ष माझ्या हाताखाली काम का केले ? : आमदार खडसेंचा फडणवीसांना सवाल
बालीशपणा सोडून कर्तृत्व सिद्ध करण्याचे दिले आव्हान
…so why did you work under me for 40 years? : MLA Khadse’s question to Fadnavis जळगाव : जर मी नालायक होतो तर 40 वर्ष तुम्ही माझ्या हाताखाली काम का केले ? असा खडा सवाल आमदार एकनाथराव खडसे यांनी फडणवीसांच्या टिकेनंतर उपस्थित केला. खडसे म्हणाले की, अजित पवार यांच्यासोबत तुम्ही सरकार स्थापन केले, तेव्हा ते तुमचे मालक होते का? देवेंद्र फडणवीस वैयक्तिक पातळीवर उतरत असून हा त्यांचा बालिशपणा आहे. त्यांनी शेतक-यांना न्याय देण्याची भूमिका ठेवावी. वैयक्तिक आरोप करण्यापेक्षा आपल्या कर्तव्याला महत्व द्यावे, असा मौलिक सल्लादेखील खडसे यांनी दिला.
फडणविसांच्या टिकेला जोरदार उत्तर
खडसेंनी जमिनीत तोंड काळं केलं नसतं तर आज काळे झेंडे दाखविण्याची वेळ आली नसती, अशी टिका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खडसेंवर केली होती. या टिकेनंतर आमदार एकनाथ खडसे यांनीदेखील जोरदाररीत्या उत्तर दिले आहे. ते म्हणाले की, फडणवीस हे ज्या पक्षात आहे, त्या पक्षात असताना मी त्यांचा मालक होतो. काही वर्षांपूर्वी त्यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासोबत सरकार स्थापन केले. त्यावेळी अजित पवार त्यांचे मालक होते का? असा सवाल त्यांनी केला आणि मी जर नालायक होतो तर इतके वर्ष तुम्ही माझ्या हाताखाली काम का केले ? असा सवालदेखील त्यांनी केला.

खडसे म्हणाले, बालीशपणा सोडा, कर्तृत्व सिद्ध करा
खडसे म्हणाले ंकी, मी विरोधी पक्ष नेता होतो. त्यांना मी कागद आणायला सांगायचो, ते कागद आणून द्यायचे. ते मला ब्रीफ करायचे. बर्याच गोष्टी त्यांच्याकडून शिकलो. मी बरीच वर्षे देवेंद्र फडणवीस यांचा मालक होतो. मी सांगायचो त्याप्रमाणे ते करायचे. मधल्या कालखंडात अजित पवारांना काही तासांसाठी आपल्या मंत्री मंडळात उपमुख्यमंत्री म्हणून घेतले. त्यांच्यासोबत संसार केला. अजित पवार त्यांचे मालक होते का? आता त्यांनी मालक का बदलला? अशा गोष्टी बोलणे हा बालीशपणा आहे. त्यापेक्षा आपले कर्तृत्व सिध्द करा, कापसाला भाव द्या, असेही ते म्हणाले.
