भुसावळातील माजी नगरसेवक दुर्गेश ठाकूर व आरोग्य सेवक मयूर अंजाळेकर यांचा उद्या खान्देश भूषण पुरस्काराने गौरव
भुसावळ : शहराचे माजी नगरसेवक दुर्गेश ठाकूर व आरोग्य सेवक मयूर अंजाळेकर यांचा खान्देश भूषण 2023 पुरस्काराने रविवार, 2 जुलै रोजी जळगाव येथे सन्मान होणार आहे. कालिका माता मंदिराजवळील हॉटेल पॅराडाईजमध्ये सायंकाळी सहा वाजता मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होणार आहे.
शिक्षण, कला, क्रीडा, सामाजिक, सांस्कृतिक, पत्रकारीता, व्यावसायीक, वैद्यकीय व आरोग्य सेवा क्षेत्रात भरीव कार्य करणार्यांचा यावेळी सन्मान करण्यात येणार आहे. सप्तरंग इव्हेंट अॅण्ड मॅनेजमेंटतर्फे या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

