राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणूनच आम्ही सत्तेत सहभागी : उपमुख्यमंत्री अजित पवार


We are in power as a NCP party: Deputy Chief Minister Ajit Pawar मुंबई : राज्यातील सर्वात मोठा राजकीय भूकंप केल्यानंतर उपमुख्यमंत्रीपदाची अजित पवारांनी शपथ घेतली. यावेळी त्यांनी पत्रकार परीषद घेत केवळ महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि देशपातळीवर मोदींना समर्थन देण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगत आगामी काळात राज्यातील सर्व निवडणुका राष्ट्रवादी पक्ष म्हणूनच लढवणार असल्याचे त्यांनी ठासून सांगितल्याने आगामी काळात त्यांची भूमिका स्पष्ट झाली आहे. राज्याचा सर्वांगीण विकास हेच ध्येय डोळ्यापुढे ठेवून आम्ही शिंदे-भाजपा सरकारसोबत सत्तेत सहभागी झाल्याचे ते म्हणाले. यावेळी मंत्री छगन भुजबळ उपस्थित होते.

या कारणास्तव घेतला आम्ही निर्णय
यावेळी अजित पवार म्हणाले की, गेल्या नऊ वर्षात नरेंद्र मोदींनी ज्या पद्धतीने देशाला पुढे नेण्याचं काम केलंय, ज्याप्रमाणे विकासाचं काम केलंय, ते पाहता त्यांच्यासोबत जायला हवं, असं आमचं मत आहे. देशाच्या राजकारणात आज सर्वच राजकीय पक्ष एकत्र येऊन नरेंद्र मोदींना विरोध केला आहे. त्यामुळेच, ही राजकीय परीस्थिती पाहता, आम्ही मोदींसमवेत जाण्याचा निर्णय घेतल्याचे अजित पवार यांनी सांगितले. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणूनच या सत्तेत, सरकारमध्ये सहभागी झालो आहे. यापुढील निवडणुका आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावरच निवडणुका लढवणार आहोत, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

शरद पवारांच्या निर्णयाकडे लागले लक्ष
अजित पवारांच्या शपथविधीला नुकतीच पक्षाची मोठी जबाबदारी मिळालेले आणि शरद पवार यांचे विश्वासू प्रफुल्ल पटलेही उपस्थित होते. त्यामुळे, आता शरद पवार काय भूमिका घेतात, हेही महत्त्वाचे आहे मात्र आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस म्हणूनच सत्तेत सहभागी झालो आहोत, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !