जनतेऐवजी नगरसेवकांमधून होणार नगराध्यक्षांची निवड
मुंबई : जनतेऐवजी नगरसेवकांमधून नगरपंचायतीसह नगरपालिकांमध्ये आता नगराध्यक्षांची निवड करण्याबाबत मंत्री मंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्र नगर परीषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या मंत्री मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीत अधिनियमात प्रस्तावित सुधारणा करण्यासाठी अध्यादेश प्रख्यापित करण्याची राज्यपालांना विनंती करण्यास आणि विधिी व न्याय विभागाच्या सल्ल्याने अध्यादेशाचा मसूदा अंतिम करण्यास मान्यता देण्यात आली.
