वंचित आघाडीच्या जनआक्रोश मोर्चाने दणाणले भुसावळ शहर

वंचित बहुजन समाजावरील अत्याचाराचा निषेध : प्रांताधिकार्‍यांना निवेदन


Bhusawal city was rocked by Vanchit Aghadi’s Janakrosh Morcha भुसावळ : राज्यातील मुस्लिम, मातंग, बौद्ध, वंचित बहुजन समाजावर सातत्याने रोज हल्ले होत असून अत्याचाराच्या विरोधामध्ये पोलीस ठाण्यात जाणार्‍या तक्रारदारांवरच दरोड्योचे खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली जात असून गुंड प्रवृत्तींना पाठीशी घातले जात असल्याच्या निषेधार्थ शहरातील वंचित बहुजन आघाडीतील यावल रोडवरील राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या पुतळ्यापासून पायी जनआक्रोश मोर्चा प्रांताधिकारी कार्यालयावर सोमवारी दुपारी एक वाजता काढण्यात आला. मोर्चेकर्‍यांच्या घोषणांनी शहर दणाणले.

या मागण्यांसाठी जनआक्रोश मोर्चा
अमळनेरच्या अशफाक शेखच्या मृत्युची व अमळनेरच्या दंगलीची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करावी, दोषी पोलीस अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांना निलंबित करावे, परळीतील जरीन खानचा पोलीस कोठडीत खून करणार्‍या पोलीस कर्मचार्‍यावर सदोष मनुष्यवधाचा 302 गुन्हा दाखल करून त्यास सेवेतून बडतर्फ करण्यासह अटक करावी, अमळनेरच्या अशफाक शेख व परळीचे जरीन खानच्या कुटूंबीयांना 50 लाखांची शासकीय आर्थिक मदत मिळावी, नांदेड जिल्हातील बोंढार गावच्या अक्षय भालेरावच्या मारेकर्‍यांना व रेणापूर येथील मातंग बांधवाचा खून करणार्‍या आरोपीला फाशीची शिक्षा करावी, भूम येथील फय्याज पठाण आत्महत्या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करून शिक्षा व्हावी, यावल तालुक्यातील मोहराळा येथील तरुणावर खोटे गुन्हे दाखल केल्याप्रकरणी संबंधित पोलिसांची चौकशी करुन योग्य ती कारवाई करावी आदी मागण्यांसाठी जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला.

यांचा जनआक्रोश मोर्चात सहभाग
वंचित आघाडीचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांच्या नेतृत्वात निघालेल्या मोर्चात जिल्हा प्रभारी रवीकांत वाघ,
जिल्हा महासचिव दिनेश इखारे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा वंदना सोनवणे, कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष बालाजी पठाडे, वंचित बहुजन कंत्राटदार संघटनेचे अध्यक्ष प्रकाश तायडे, वंचित बहुजन कंत्राटदार संघटना महासचिव प्रकाश सरदार, जिल्हा आय.टी.प्रमुख सचिन बार्‍हे ,महिला आघाडी जिल्हा महासचिव वंदना आराक, जिल्हा उपाध्यक्ष मोहम्मद शफी शेख, गौतम लोखंडे, महेंद्र सुरडकर, महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्ष मीरा वानखेडे, जिल्हा संघटक राजेंद्र बारी, याकुब शेख, सलीम शेख, अरुण तायडे, विद्यासागर खरात, जिल्हा सचिव दीपक मेघे, बंटी सोनवणे, गोपीचंद सुरवाडे, जिल्हा प्रवक्ता विनोद इंगळे, कामगार आघाडी जिल्हा महासचिव संतोष कोळी यावल तालुका यावल तालुका अध्यक्ष भगवान मेघे,रावेर तालुका अध्यक्ष बाळू शिरपुरे, मुक्ताईनगर तालुका अध्यक्ष दिलीप पोहेकर, बोदवड तालुकाध्यक्ष सुपडा निकम, जामनेर तालुकाध्यक्ष सचिन सुरवाडे, भुसावळ तालुका महासचिव गणेश इंगळे, प्रमोद बावस्कर, निलेश जाधव, भुसावळ शहराध्यक्ष गणेश जाधव, भुसावळ शहर महासचिव मेजर देवदत्त मकासरे, महिला आघाडी मुक्ताईनगर तालुकाध्यक्ष संगीता धोबी, महिला आघाडी बोदवड तालुकाध्यक्ष प्रमिला बोदडे, महिला आघाडी यावल तालुकाध्यक्ष गिताताई इंगळे, महिला आघाडी रावेर तालुकाध्यक्ष गायत्री कोचुरे, महिला आघाडी भुसावळ तालुकाध्यक्ष वैशाली राव, कामगार आघाडी भुसावळ तालुकाध्यक्ष रमेश खंडारे आदींचा सहभाग होता. दरम्यान, भारतीय बौध्द महासभेने या मोर्चाला पाठिंबा दिला व समता सैनिक दलाचे मेजर कर्नल युवराज नरवाडे, भारतीय बौध्द महासभेचे आत्माराम सुरडकरसह पदाधिकारी उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !