जैन मुनींच्या हत्येचा निषेध : भुसावळात मूक मोर्चा


Protest against killing of Jain sages: Silent march in Bhusawal भुसावळ : कर्नाटक येथे काही समाज कंटकांनी जैन मुनी आचार्य 108 श्री कामकुमार नंदीजी महाराज यांचे अपहरण करीत त्यांची निर्घृण हत्या केल्याची आल्याची बाब उघडकीस आल्यानंतर या घटनेचा देशभरातून निषेध होत आहे.. या घटनेच्या निषेधार्थ शहरातील सकल जैन समाज भुसावळतर्फे मंगळवारी दुपारी तीन वाजता आठवडे बाजारातील दिगंबर जैन मंदिरापासून तहसील कार्यालयादरम्यान पायी मूक निषेध मोर्चा काढण्यात आला. मोर्चेकर्‍यांनी फलकांद्वारे हत्येचा निषेध नोंदवला तसेच जगा व जगू द्या या आशयाचा संदेशही दिला.

शेकडो समाजबांधवांचा सहभाग
मंगळवारी दुपारी तीन वाजता आठवडे बाजारातील दगंबर जैन मंदिरापासून पायी मूक निषेध मोर्चाला सुरूवात झाली. मोर्चेकर्‍यांच्या हातात जैन मुनींच्या हत्येच्या निषेधाचे फलक होते. संतांविषयी आदरभाव व्यक्त करून हत्येच्या कृतीचा निषेध फलकांद्वारे मोर्चेकर्‍यांनी व्यक्त केला. तहसील कार्यालयात मोर्चा आल्यानंतर तहसील प्रशासनाला निवेदन देण्यात आले. निवेदनाचा आशय असा की, जैन आचार्य कामकुमारनंदीजी यांच्या हत्येप्रकरणी हुसेन दलाईट व नारायण या दोन गुन्हेगारांना अटक करण्यात आली असून आरोपींच्या मागे असलेल्या शक्तींचा शोध घेवून अन्य दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच जैन समाजातील संत-महंतांना व मंदिर-मठांना सुरक्षा पुरवावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

यांचा मोर्चात सहभाग
निषेध मोर्चात सतीश रवींद्र साखरे, अमोल चंद्रकांत वास्कर, रमेश भिकाजी अन्नदाते, गौतम चोरडिया, अजय जैन, चेतन जैन, गजुदासजी छाजेड यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !