ठाणे जिल्ह्यात भीषण अपघात ; न्हावीतील युवकासह सहा जण ठार


Fatal accident in Thane district ; Six people were killed, including a youth from Navi
यावल :
यावल तालुक्यातील न्हावी येथील 22 वर्षीय तरुणाचा ठाणे जिल्ह्यात अपघाती मृत्यू झाला. काली-पिली जीपद्वारे हा तरुण जात असतांना ठाणे जिल्ह्यातील पडघा खडावली फाट्याजवळ जीपचा कंटेनर सोबत अपघात घडला. यात या तरुणासह एकूण सहा जण ठार झाले. प्रज्वल शंकर फिरके (22, न्हावी, ता.यावल) असे मयत तरुणाचे नाव आहे.

न्हावीत अपघातानंतर शोककळा
ठाणे जिल्ह्यातील पडघा खडावली फाट्याजवळ कंटेनर (एम.एच.48 टी.7532 ) व काली-पिली जीप (एम.एच.04 ई.1771) विद्यार्थी घेऊन पडघावरुन खडावली रेल्वे स्टेशनला जात असताना भीषण अपघात झाला. त्यामध्ये सहा जण ठार झाले असून तीन जखमी झाले. यात यावल तालुक्यातील न्हावी येथील रहिवाशी व हल्ली पडघात वास्तव्यास असलेल्या प्रज्वल शंकर फिरके (22) या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. अपघाताची बातमी कळताच न्हावी गावात शोककळा पसरली. या अपघातात चिन्मयी विकास शिंदे (15), रीया किशोर परदेशी, चैताली सुशांत पिंपळे
(27), संतोष अनंत जाधव (50), वसंत धर्मा जाधव (50), प्रज्वल शंकर फिरके (22) या सहा जणांचा मृत्यू झाला. दिलीप कुमार विश्वकर्मा (29), चेतना गणेश जसे (19), कुणाल ज्ञानेश्वर भामरे (22) जखमी असून त्यांना भिवंडी येथील मायरा हॉस्पिटलमध्ये उपचाराकरीता दाखल करण्यात आले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !