भुसावळात किरीट सोमय्यांच्या प्रतिमेला चपला मारून कृत्याचा निषेध


Protest against the act of slapping the image of Kirit Somaiya in Bhusawal भुसावळ : भाजपाचे प्रवक्ते व माजी खासदार किरीट सोमैय्या यांचा आक्षेपार्ह स्थितीतील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या घटनेचा भुसावळातील शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निषेध केला आहे.

यांचा आंदोलनात सहभाग
सोमैय्या यांच्या प्रतिमेला बुट-चप्पल मारून यावल रोडवरील राष्ट्रपिता महात्मा गांधी पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात आले. किरीट सोमय्या यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी शिवसेना शहर प्रमुख दीपक धांडे, निलेश महाजन, संतोष सोनावणे, बबलू बर्‍हाटे, हेमंत खंबाईत, नगरसेवक मुकेश गुंजाळ, पप्पू बारसे, कैलाश लोखंडे, सोनी ठाकूर, राकेश खरारे, अरुण साळुंके, पवन नाले, पिंटू भोई, दत्तू नेमाडे, जितू पाटील, नरेंद्र लोखंडे, सुरज पाटील, राजू इंगळे, लोखंडे, दिलीप सुरवाडे, मनोज पवार, नबी भैया, धनराज ठाकूर आदी शिवसैनिक उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !