भुसावळ तालुक्यातील अल्पवयीन मुलीला पळवले
A minor girl from Bhusawal taluka was abducted भुसावळ : भुसावळ तालुक्यातील जोगलखोरी येथून अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याचा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी गजानन सुधाकर मोरे (जोगलखोरी) या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल
17 वर्षीय अल्पवयीन तरुणी जोगलखोरी येथे कुटूंबासह वास्तव्यास असून गावातील संशयित गजानन मोरे याने तरुणीला काहीतरी आमिष दाखवून 15 ते 16 दरम्यान पळवून नेले. या प्रकरणी पीडीतेच्या आईने भुसावळ तालुका पोलिसात तक्रार दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार युनूस मुसा शेख करीत आहेत.
