थोरगव्हाण गावातील विवाहित तरुणाची आत्महत्या
Suicide of a married youth in Thorgavan village यावल : यावल तालुक्यातील थोरगव्हाण गावातील विवाहित तरुणाने शेतात गळफास घेत आत्महत्या केली. पोलिसात याप्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली. अतुल ईश्वर पाटील (बेदारे, 28, थोरगव्हाण) असे मयत युवकाचे नाव आहे.
आत्महत्येचे कारण अस्पष्ट
गुरुवार, 20 जुलै रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास थोरगव्हाण शिवारातील आपल्या शेतातील बांधावर असलेल्या झाडास ठिबक नळीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. अतुल ईश्वर पाटील (बेदारे) याने आत्महत्या का केली? हे मात्र स्पष्ट होवू शकले नाही. यावलच्या ग्रामीण रुग्णालयात अतुल ईश्वर पाटीलच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. या घटनेची खबर भारत चावदस पाटील यांनी खबर दिल्यानंतर अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे. मयताच्या पश्चात आई, पत्नी, मुलगी, मुलगा असा परीवार आहे.
