यावल शहरातील हरी ओम नगरातील विवाहितेचा छळ
Harassment of Hari Om Nagar in Yaval City यावल : शहरातील हरी ओम नगरातील माहेर असलेल्या 30 वर्षीय विवाहितेचा पतीसह 11 जणांनी छळ केला. विवाहितेला सतत टोचून बोलून मारहाण करीत जिवे ठार मारण्याची धमकी दिली. यावल पोलीस ठाण्यात 11 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
या संशयितांविरोधात दाखल झाला गुन्हा
यावल शहरातील हरी ओम नगरातील माहेर आणि सासर असलेल्या सलीमा संजय तडवी (30) यांनी यावल पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचा विवाह 2011 मध्ये झाला. तेव्हापासून तिला पती संजय तडवीसह पतीचे नातेवाईक अशा 11 जणांनी मिळून तिचा किरकोळ कारणावरून छळ केला व सतत शिवीगाळ करून टोमणे मारले आणि पतीला चिथावणी देऊन पतीने तिला मारहाण करून ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी यावल पोलिसात विवाहितेच्या फिर्यादीवरून 11 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार राजेंद्र पवार करीत आहेत.
