परसाडेत 30 वर्षीय तरुणाला सर्पसदृश्य प्राण्याचा दंश


यावल : यावल तालुक्यातील परसाडे येथील एका 30 वर्षीय तरुणाला शेतात काम करत असतांना त्याच्या डाव्या हाताला सर्प सदृश्य दंश झाला. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर त्यास तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. या ठिकाणी त्याच्यावर उपचार सुरू आहे.

तरुणाची प्रकृती स्थिर
परसाडे, ता.यावल येथील रहिवासी रसूल दगडू तडवी (30) हा तरुण शेत शिवारात काम करीत असताना त्याच्या डाव्या हाताला काहीतरी चावले. सर्प सदृश दंश त्याला जाणवू लागल्याने त्याची प्रकृती अस्वस्थ होऊ लागली. त्याला तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारार्थ दाखल केले. रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रशांत जावळे, अधिपरीचारीका आरती कोल्हे, बापू महाजन, पिंटू बागूल आदींनी त्याच्यावर उपचार केले आहे. त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !