बोरखेडा- मोरझिरा ग्रुपग्रामपंचायतीच्या सरपंचपदी उषा चव्हाण बिनविरोध


मुक्ताईनगर : मुक्ताईनगर तालुक्यातील बोरखेडा-मोरझिरा ग्रुपग्रामपंचायतीच्या सरपंचपदी उषा गोपाल चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सोमवार, 24 रोजी सोमवारी सरपंच निवडीसाठी बोरखेडा जुने येथील ग्रामपंचायत कार्यालयात बैठक झाली. निवडणूक अधिकारी मंडळाधिकारी डी.एल.पाटील होते. त्यांना सहाय्यक म्हणून तलाठी नाईक, ग्रामसेवक योगेश पवार, सुधाकर भोलाणकर, सुभाष कांडेलकर उपस्थित होते. चव्हाण यांचा एकच अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

यांची होती उपस्थिती
यावेळी माजी सरपंच सुरेखा अनिल राठोड, उपसरपंच संगीता शांताराम पिंगळे, ग्रामपंचायत सदस्य शांताराम पवार, विकास तायडे, विनोद चव्हाण, रवी ताकतोडे, वैशाली नवल जाधव, हमीदाबी शेख ईस्माईल उपस्थित होते. सरपंच उषा चव्हाण म्हणाल्या की, गावाच्या विकासासाठी आपण कायम कटीबध्द राहू. बोरखेडा जुने,बोरखेडा नवे,आणि मोरझिरा या तिन्ही गावातील ग्रामस्थांच्या समस्या सोडविण्यासाठी तप्तर राहणार असल्याचे त्या म्हणाल्या. दरम्यान, सुरेखा अनिल राठोड यांनी ठरल्याप्रमाणे अडीच वर्षाच्या सरपंच कालावधीनंतर पदाचा राजीनामा दिल्यानंतर निवड प्रक्रिया राबवण्यात आली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !