श्री क्षेत्र मनुदेवी येथे नारळ विक्रेत्या व्यावसायीकास तिघांची मारहाण


A businessman who sells coconuts was beaten up by three people at Sri Kshetra Manudevi यावल : यावल तालुक्यातील आडगाव येथून जवळ असलेल्या श्री क्षेत्र मनुदेवी मंदिराजवळ नारळ विक्री करणार्‍या 34 वर्षीय तरुणाला जळगाव येथील तिघांनी मारहाण केली व लाकडी बांबूने डोक्यात मारून दुखापत केली. याप्रकरणी यावल पोलिसात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

तिघांविरोधात गुन्हा दाखल
आडगाव, ता.यावल येथून जवळच श्री क्षेत्र मनुदेवी मंदिर आहे. या मंदिर परीसरात प्रवीण सुरेश चौधरी (34, आडगाव) हा नारळ विक्रीचा व्यवसाय करतो. त्याच्या दुकानावर धीरज पांडुरंग लहाने, सुरेश कल्पेश माळी व भावेश अनिल धांडे (तिघे रा.जळगाव) हे नारळ खरेदीसाठी व पूजेचे साहित्य घेण्यासाठी आल्यानंतर साहित्य खरेदी वरून त्यांच्यात वाद झाला आणि त्या तिघांनी प्रवीण चौधरी याला मारहाण केली शिवीगाळ केली आणि त्याच्या डोक्यावर लाकडी बांबूने वार करून दुखापत केली. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार नरेंद्र बागुले करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !