सुकी नदीत वाहिलेल्या रोझोद्यातील बेपत्ता तरुणाचा अखेर मृतदेह आढळला
The body of the missing youth who was washed away in the Suki river has finally been found रावेर : रोझोदा गावातील महेंद्र दगडू चौधरी (35) हा तरुण सुकी नदीतील पाण्यात वाहून गेल्यानंतर शोध सुरू असताना चौथ्या दिवशी या तरुणाचा मृतदेहच हाती आला.
तरुणाचा अखेर मृतदेहच हाती
शुक्रवार, 21 रोजी मित्रांसोबत गारबर्डी धरणाजवळ फिरण्यासाठी गेलेला महेंद्र चौधरी हा तरुण सुकी नदीमध्ये अंघोळ करून येतो म्हणून बाहेर पडला मात्र नंतर पुराच्या पाण्यात बेपत्ता झाला. सावदा पोलिसात मित्र हेमराज सुरेश भोळे (रोझोदा) यांच्या खबरीनुसार हरवल्याची नोंद करण्यात आली.
तपास सुरू असताना सावदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक जालिंदर पळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विनोद खांडबहाले, एएसआय खोडपे, नाईक देवेंद्र पाटील, मेहरबान तडवी, संजय तडवी यांना तरुणाचा मृतदेह चिंचाटी शिवारातील सातपुडा पर्वत रांगांमध्ये माकडधरीच्या खोर्यातील सुकी नदीपात्रात मंगळवारी आढळला. ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होताच तरुणाचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
