राजोर्‍यात संतप्त महिला व तरुणांनी फोडल्या गावठी दारूच्या भट्ट्या ; दोघांविरोधात गुन्हा दाखल


In Rajuura , angry women and youth broke village liquor kilns ; A case has been registered against both यावल : यावल तालुक्यातील राजोरा या गावातील संतप्त महिला आणि तरुणांनी गावातील गावठी दारूच्या हातभट्टी सुरू असलेल्या ठिकाणी जावून दारूचे कच्चे रसायन असलेल्या टाक्या फोडल्या. महिलांसह तरुण थेट गावालगत असलेल्या नाल्यातील दारूच्या भट्ट्यांवर धडकले आणि पोलिसांना माहिती कळवण्यात आली. यावल पोलिसांनी याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हे दाखल केले.

महिलांच्या आक्रमक पवित्र्याने उडाली खळबळ
राजोरा, ता.यावल या गावात अवैध गावठी हातभट्टीची दारू अनेक ठिकाणी विक्री केली जात असल्याने अनेकांना दारूचे व्यसन लागले आहे. गावातील महिला आणि तरुण संतप्त झाल्यानंतर त्यांनी गावालगत नाल्यातील गावठी दारूच्या हात भट्टीवर जाऊन त्या ठिकाणी दारूचे कच्चे रासायन भरलेल्या टाक्या फोडल्या व पोलिसांना माहिती कळवली. यावल पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी या दारू भट्ट्या लावणार्‍या भगवान अडकमोल व सोपान कोळी या दोघांविरुद्ध गुन्हे दाखल केले. तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक किशोर परदेशी, संदीप सूर्यवंशी करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !