पिळोदा गावानजीक मानवी कवटी व हाडे सापडल्याने खळबळ
Excitement over discovery of human skull and bones near Piloda village फैजपूर : भुसावळ-पिंळोदा बु.॥ गावादरम्यानच्या नाल्याजवळ मानवी कवटीसह हाडे सापडल्याने खळबळ उडाली आहे. मयत स्त्री की पुरूष याबाबत अस्पष्टता असून सुरूवातीला फैजपूर पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. मानवी हाडे सापडल्याने विविध तर्क-वितर्कही लढवले जात आहेत.
पोलीस अधिकार्यांची धाव
भुसावळ-पिळोदा बु.॥ रस्त्यावरील नाल्याच्या कडेला मानवी कवटी व हाडे पडून असल्याची माहिती फैजपूर पोलिसांना नागरीकांनी दिल्यानंतर पोलीस उपअधीक्षक डॉ.कुणाल सोनवणे, सहाय्यक निरीक्षक निलेश वाघ व कर्मचार्यांनी धाव घेतली. पोलिसांनी हाडे व कवटी जप्त केली असून ती अधिक तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबकडे रवाना केली आहे. मयत पुरूष वा स्त्री हे अद्याप अस्पष्ट आहे. मयताचा सुमारे दोन महिन्यांपूर्वीच मृत्यू झाल्याचा अंदाज आहे शिवाय घटनास्थळी संशय येईल, असे कुठलेही पुरावे मिळाले नसल्याने मयत वाहून आला असल्याचाही प्राथमिक अंदाज आहे मात्र फॉरेन्सिक लॅबच्या अहवालाअंती पोलिसांची पुढील कारवाईची दिशा ठरणार आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक निलेश वाघ करीत आहेत.
