मुक्ताईनगरात मुलाचा खून करण्याची धमकी देत वयोवृद्धेचा विनयभंग


Elderly molested by threatening to kill child in Muktainagar मुक्ताईनगर : पोलीस ठाण्यात पीडीतेच्या मुलाने तक्रार केल्याचा राग आल्याने 60 वर्षीय वयोवृद्धेस अश्लील शिविगाळ करून तिचा विनयभंग करण्यात आल्याची घटना शहरात मंगळवरी दुपारी साडेचार वाजता घडली. याप्रकरणी संशयित मोनु अर्जुन भोई (मुक्ताईनगर) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

अश्लील शिविगाळ करीत विनयभंग
60 वर्षीय पीडीता एका भागात वास्तव्यास असून त्यांचा मुलगा संशयिताविरोधात मुक्ताईनगर पोलिसात तक्रार करण्यासाठी गेल्यानंतर संशयिताने दारूच्या नशेत पीडीतेला अश्लील शिविगाळ केली तसेच मुलाविषयी अपशब्द वापरून त्याचा खून करेल, अशी धमकीही दिली. या प्रकरणी भादंवि 354 अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस निरीक्षक शरद इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार भोई करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !