वरणगाव पोलिसांनी रोखली प्राण्यांची निदर्यतेने वाहतूक : एकाविरोधात गुन्हा
Illegal transportation of animals : Varangaon police rescued three bulls भुसावळ : प्राण्यांची निर्दयतेने कत्तलीच्या उद्देशाने वाहतूक होत असताना वरणगाव पोलिसांनी कारवाई करीत तीन बैलांची सुटका केली. याप्रकरणी एकाविरोधात वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
तीन बैलांची सुटका
कॉन्स्टेबल योगेश सुभाष पाटील यांच्या फिर्यादीनुसार, हतनूर गावाजवळील तापी नदीच्या पुलावर सोमवार, 24 रोजी सकाळी 11.45 वाजता अशपाक रज्जाक खान (24, ईमामवाडा, रावेर) हा टाटा मालवाहतूक वाहन (एम.एच.12 जे.एफ.6631) द्वारे तीन बैलांची क्रुरतेने वाहतूक करताना आढळल्याने त्यास ताब्यात घेण्यात आले तर वाहनातील 45 हजार रुपये किंमतीच्या तीन बैलांची सुटका करण्यात आली असून 60 हजार रुपये किंमतीचे वाहन जप्त करण्यात आले. तपास नाईक नाविद अली करीत आहेत.
