चुंचाळे ते चुंचाळे फाटा रस्त्याची चाळण

लोकप्रतिनिधी बेदखल ः वाहनधारक संतप्त


यावल : चुंचाळे ते चुंचाळे फाटादरम्यान तीन किलोमीटर अंतराच्या रस्त्याची चाळण झाल्याने वाहनधारक संतप्त झाले आहेत. बर्‍हाणपूर-अंकलेश्वर महामार्गाला व जळगाव जाण्यासाठी सोयीचा असलेल्या रस्त्याची दुर्दशा झाल्यानंतरही लोकप्रतिनिधींसह सार्वजनिक बांधकामाचे अधिकारी दखल घेत नसल्याने संताप व्यक्त होत आहे. काही सुज्ञ ग्रामस्थ व तरुण आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत.

जीवघेण्या खड्ड्यांमुळे अपघाताची भीती
चुंचाळे-चुंचाळे फाटादरम्यानच्या तीन किलोमीटर रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडल्याने या रस्त्यावरुन मार्गक्रमण करणे म्हणजे अपघाताला निमंत्रण देण्यासारखे आहे. या रस्त्याकडे संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधींसह प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. या रस्त्याचे नवीन डांबरीकरण करावे, अशी मागणी होत आहे. या रस्त्यावरून चुंचाळे, बोराळे, गायरान, नायगाव, मालोद, आडगाव, दहिगाव, सौखेडासीम आदी गावे जोडलेली आहेत तसेच जळगाव जाण्यासाठी देखील हा रस्ता सोयीचा असल्याने वर्दळ असते मात्र काम होत नसल्याने वाहनधारक त्रस्त झाले आहेत. आमदार लता चंद्रकांत सोनवणे यांनी लक्ष देत डांबरीकरणाबाबत पुढाकार घेण्याची अपेक्षा आहे. अनेकदा मागणी करूनही नवीन रस्ता होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !