मुंबई-छपरा उन्हाळी विशेष गाडीच्या कालावधीत वाढ
भुसावळ : रेल्वे प्रवाशांची अतिरीक्त गर्दी कमी करण्यासाठी छपरा-लोकमान्य टिळक टर्मिनस-सिवान उन्हाळी विशेष ट्रेनचा कालावधी वाढवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.
05064 उन्हाळी विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस ते सिवान ही गाडी 30 जुलै ते 2 सप्टेंबर 2023 पर्यंत तसेच 05063 उन्हाळी विशेष गाडी 28 जुलै 2023 ते 1 सप्टेंबर 2023 पर्यंत छपरा ते लोकमान्य टिळक टर्मिनस पर्यंत नियमित करण्यात आली आहे. गाडी क्रमांक 05063/05064 उन्हाळी विशेष ट्रेनच्या वेळेत, रचना आणि थांब्यामध्ये कोणताही बदल झालेला नाही.
