वरणगावात शिवसेनेतर्फे 100 विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम


वरणगाव : शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वरणगाव शहरातील जिल्हा परदीषद शाळेतील शंभर विद्यार्थी-विद्यार्थिनींना शालेय साहित्याचे गुरुवार, 27 जुलै गुरुवारी सकाळी 10 वाजता वाटप करण्यात आले. अध्यक्षस्थानी शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन होते. प्रास्ताविक शहरप्रमुख संतोष माळी यांनी केले. जिल्हा परीषद शाळेतील मुले-मुलींना प्रत्येकी वहि, पेन, पेन्सील, कंपास पेटी, बिस्किट पुडा असे एकूण 100 विद्यार्थांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी जिल्हाप्रमुख समाधान महाजन, ज्येष्ठ शिवसैनिक सुरेश चौधरी, उपतालुकाप्रमुख सुभाष चौधरी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बद्दल मनोगत व्यक्त केले.

यांची कार्यक्रमास उपस्थिती
यावेळी उप शहरप्रमुख राम शेटे, सुखदेव धनगर, अशोक शर्मा, सुनील भोई, निलेश सुरडकर, शाखाप्रमुख सुनील कोळी, शेख सत्तार, आबा सोनार, शिवा भोई, हनीफ कच्ची, प्रल्हाद माळी, पंकज चौधरी, मोहन धनगर, गोली भोई, महीला संघटीका योगीता सोनार, इरफान खान, योगेश कोळी, अमोल कोळी, निलेश माळी, बापू माळी, जितेंद्र माळी, नाथ चौधरी यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते. यशस्वीतेसाठी जिल्हा परीषद शाळेचे मुख्याध्यापिका वनिता सोनवणे, मालती मराठे, राकेश कुलकर्णी यांनी सहकार्य केले. सूत्रसंचालन शिक्षक रवींद्र पोळ यांनी केले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !