दोन लाखांसाठी मोहराळे येथील विवाहितेचा छळ : तिघांविरोधात गुन्हा दाखल
Harassment of a married woman in Moharale for two lakhs: A case has been registered against three यावल : यावल तालुक्यातील मोहराळे येथील 40 वर्षीय विवाहितेचा माहेरून दोन लाख रुपये आणावे म्हणून तिघांनी छळ केला व तिला मारहाण केली. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
तिघांविरोधात गुन्हा दाखल
मोहराळे, ता.यावल या गावातील ज्योती गुणवंत पाटील (40) या विवाहितेने यावल पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचे पती गुणवंत समाधान पाटील, प्रदीप समाधान पाटील व हर्षाली प्रदीप पाटील (सर्व राहणार मोहराळे) या तिघांनी तिचा माहेरून दोन लाख रुपये आणावे म्हणून छळ केला तसेच शारीरीक आणि मानसिक त्रास देऊन तिला मारहाण केली. छळ असह्य झाल्यानंतर पीडीतेने याप्रकरणी फिर्याद दिल्यावरून यावल पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार नितीन चव्हाण करीत आहे.
