ओव्हरटेकच्या प्रयत्नात पारंबीनजीक बसचे टायर फुटले ; 9 प्रवासी जख्मी


A bus near Parambin bursts its tires in an attempt to overtake; 9 passengers injured
मुक्ताईनगर :
ट्रॅक्टरला ओव्हरटेक करताना जळगाव-काटेलधाम बसचे पारंबी फाट्याजवळ पुढील टायर फुटल्यानंतर झालेल्या अपघातात बसमधील 9 प्रवासी जखमी झाले. हा अपघात शुक्रवारी सकाळी घडला. बसमधील प्रवाशांना तातडीने कुर्‍हा प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात दाखल करण्यात आले.

अपघातानंतर उडाली खळबळ
जळगाव-काटेलधाम बस (क्रमांक एम.एच. 20 बी.एल. 1770) ही मुक्ताईनगर आगाराची बस शुक्रवारी सकाळी काटेलधामकडे निघाल्यानंतर कुर्‍हा-काकोडा पुढील पारंबी गावाच्या फाट्याजवळ बस चालक महेंद्र कोळी चालकाने ट्रॅक्टरला ओव्हरटेक केले मात्र त्याचवेळी बस रस्त्यालगतच्या तोडलेल्या झाडाच्या बुंध्यावरून नेल्याने बसचे पुढील टायर फुटले. यामुळे बस रस्त्यालगतच्या शेताच्या बांधावर जावून थांबल्याने मोठा अपघात टळला मात्र या घटनेत बसमधील प्रतीक्षा सुनील झांबरे (22, आळंद), समाधान उखर्डा तायडे (69, मानेगाव), कमल गोविंदा पवार (59, वढोदा), जानकोर त्र्यंबक महाले (75, वढोदा), नलिनी भास्कर न्हावी (70, वढोदा), अनुराधा पाटील (35, मेळसांगवे), कस्तुराबाई भोलाणकर (70, शिरसोली), सपना विनोद पाटील (27) व सार्थक विनोद पाटील (2, जामनेर) असे 9 प्रवासी किरकोळ जखमी झाले. जखमींना तातडीने मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मदतीसाठी सरसावले अनेक हात
कुर्‍हा सरपंच डॉ.बी.सी.महाजन यांनी कुर्‍हा ग्रामपंचायतीची रुग्णवाहिका पाठवली तर शिवसेना शहरप्रमुख पंकज पांडव यांनी शिवसेनेची रुग्णवाहिका स्वतः चालवत अपघातातील जखमींना उपचारासाठी दाखल केले. डॉ.बी.सी.महाजन, प्रकाश शेठ चौधरी, पंकज पांडव, मयूर साठे, देवेंद्र रायपुरे आदींनी जखमींवर उपचारासाठी तातडीने प्रयत्न केले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !