पूरनाड गावातून चोरट्यांनी दुचाकी लांबवली


Thieves stole a bike from Purnad village मुक्ताईनगर : तालुक्यातील पूरनाड गावातून चोरट्यांनी घराबाहेर लावलेली 20 हजार रुपये किंमतीची दुचाकी लांबवली. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

चोरी झाल्याने गावात खळबळ
दिनेश रामभाऊ पाटील (44, पूरनाड) हे शेतकरी असून त्यांच्याकडे दुचाकी (एम.एच.19 सी.एम.0027) असून त्यांनी ती घराबाहेर लावली असता 26 ते 27 जुलैदरम्यान चोरट्यांनी दुचाकी लांबवली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर पाटील यांनी मुक्ताईनगर पोलिसात तक्रार दिल्यानंतर अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास नाईक धर्मेंद्र ठाकूर करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !