भुसावळात गढूळ पाण्याचा प्रश्न पेटला : नगरपालिकेत शिवसेनेचे ठिय्या आंदोलन
प्रशासन धारेवर : साडेपाच कोटी खर्चूनही दूषित पाणी मिळत असल्याने संताप
Dirty water issue flared up in Bhusawal: Shiv Sena’s protest in the municipality
भुसावळ : शहरवासीयांना अत्यंत दूषित व गढूळ पाणीपुरवठा होत असल्याने प्रभाग 24 च्या संतप्त महिलांनी प्रांताधिकारी कार्यालयावर पायी मोर्चा काढत अधिकार्यांना गुरुवारी धारेवर धरले असताना दुसर्या दिवशी पुन्हा शिवसेना उबाठा गटाने पालिकेवर धडक दूषित पाण्याबाबत जाब विचारला. मुख्याधिकारी पालिकेने नसल्याने आंदोलकांनी पालिकेच्या प्रवेशद्वारावरच ठिय्या आंदोलन मांडत संताप व्यक्त केला. मुख्याधिकारी एक तासानंतर पोहोचल्यानंतर त्यांनी आंदोलकांचे म्हणणे ऐकून घेत समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले तसेच तांत्रिक अडचणीदेखील मांडल्याने नंतर आंदोलक शांत झाले.
गढूळ पाण्यामुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात
भुसावळ शहरातील पाणीप्रश्नी शिवसेना उध्दव ठाकरे गटाच्या पदाधिकार्यांनी शुक्रवार, 28 रोजी दुपारी 12 वाजता पालिकेसमोर निदर्शन आंदोलन केले. आंदोलन सुरू होताच निवेदन स्विकारण्यासाठी उपमुख्याधिकारी लोकेश ठाके व कार्यालय अधीक्षक परवेज शेख प्रवेशव्दाराजवळ आले मात्र पाणीपुरवठ्याच्या संदर्भात आपणास संबंधिताना माहिती दिल्याने मुख्याधिकारी महेश वाघमोडे व पाणीपुरवठा अभियंता सतीश देशमुख यांना बोलवावे, अशी भूमिका आंदोलकांनी मांडत प्रवेशद्वारावरच ठिय्या मांडून निदर्शन केली. तासाभराने मुख्याधिकारी पालिकेत आल्यानंतर यावेळी आंदोलकांनी पाणीप्रश्न अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला.

साडेपाच कोटी खर्चूनही गढूळ पाणीपुरवठा
मुख्याधिकारी आल्यानंतर आंदोलकांनी त्यांना गढूळ पाण्याबाबत जाब विचारला.
यंत्रणेवर साडेपाच कोटी रुपयांचा निधी खर्च केला जात असतानाही गाळमिश्रीत पाणीपुरवठा का होतोय? या प्रश्नावर मुख्याधिकार्यांनी हे काम अद्याप सुरू असल्याचे स्पष्ट केले. शहरातील बंद पथदिवे, रस्ते, गटारी आदी प्रश्नीही आंदोलकांनी अधिकार्यांना धारेवर धरले.
यांचा आंदोलनात सहभाग
शिवसेना शहरप्रमुख दीपक धांडे, हेमंत खंबायत, माजी नगरसेवक पप्पू बारसे, मुकेश गुंजाळ, निलेश महाजन, अॅड.कैलास लोखंडे, राकेश खरारे, मकबूल मेंबर, स्वप्नील सावळे, पिंटू भोई, दिलीप सुरवाडे, रींकू भोई, शरद जयस्वाल, शरद जोहरे, मनोज पवार, संदीप महाजन, दिगंबर धनगर, पिंटू जावळे, राजू इंगळे,नबी भैय्या आदी शिवसैनिक उपस्थित होते.
