सुकी धरण परीसरातील सात हेक्टरवरील अतिक्रमण हटविले : वनविभागाच्या कारवाईने खळबळ


Encroachment on seven hectares of Suki Dam area removed : Forest department’s action stirs up excitement रावेर : रावेर तालुक्यातील सुकी धरणाच्या वन क्षेत्रात झालेले सात हेक्टरवरील अतिक्रमण वन परीक्षेत्र अधिकारी अजय बावणे यांच्या मार्गदर्शनाखाली हटवण्यात आले तर यंत्राच्या सहाय्याने खोल चर खोदण्यात आले आहेत. यावल वन क्षेत्रात येणार्‍या सुकी धरण परीसरातील जानोरी नियत क्षेत्रात सात हेक्टरवर अतिक्रमण करण्यात आल्याची माहिती वन अधिकार्‍यांना मिळाली होती. यावल वन विभागाचे उपवनसंरक्षक जमीर शेख, सहायक वनसंरक्षक प्रथमेश हाडपे यांच्या मार्गदर्शनाखाली व रावेरचे वनपरिक्षेत्र अधिकारी अजय बावणे, फैजपूरचे वनपाल अतुल तायडे, वनरक्षक सुपडू सपकाळे वनमजूर सुखराम बारेला, हमीद तडवी यांच्या पथकाने अतिक्रमण काढण्याची कारवाई केली आहे.

समांतर चर खोदले, कारवाईचा इशारा
काढलेल्या अतिक्रमित जमिनीवर पुन्हा नव्याने अतिक्रमण होऊ नये म्हणून वन अधिकार्‍यांनी दक्षता घेतली आहे. या ठिकाणी जेसीबीच्या साहाय्याने खोल समांतर चार खोदले आहेत. दरम्यान वन क्षेत्रावर वन विभागाची नजर असून कोणीही अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्याविरुद्ध कडक कायदेशीर करण्यात येईल. अतिक्रमण हटाव मोहिम अशीच सुरू राहिल असे वनपरीक्षेत्र अजय बावणे यांनी सांगितले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !