स्वयंसिध्द होण्यासाठी महिलांनी उद्योजक व्हावे ः तहसीलदार निता लबडे


To become independent, women should become entrepreneurs: Tehsildar Nita Labde भुसावळ : नोकरीच्या मागे न धावता व्यवसाय करावा व या उपक्रमामुळे उद्योजकांना नक्की फायदा होईल. महिलांनी स्वयंसिध्द होण्यासाठी उद्योजक व्हावे. छोट्या व्यावसायीकांना हक्काची बाजारपेठ मिळावी, म्हणून प्रदर्शनांचे आयोजन महत्वाचे आहे, असे मत तहसीलदार निता लबडे यांनी व्यक्त केले. जेसीआय ताप्ती क्लबतर्फे महिला बचत गटातून निर्मिती उत्पादनांना बाजारपेठ मिळावी म्हणून हॉटेल अतिथीच्या हॉलमध्ये शुक्रवारपासून तीन दिवसीय प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या.

अशा उपक्रमांनी उद्योजकांना फायदा
जेसीआय ताप्ती क्लबतर्फे शुक्रवारपासून तीन दिवस प्रदर्शनचे उद्घाटन भुसावळ शहरातील निता लबडे यांच्या हस्ते करण्यात आले. स्टॉलधारकांच्या कला पाहून त्यांनी महिलांचे कौतुक केले तसेच अशा प्रदर्शनाची सध्या आवश्यकता असल्याचे सांगितले. नोकरीच्या मागे न धावता व्यवसाय करावा व या उपक्रमामुळे उद्योजकांना नक्की फायदा होईल, असे सांगून उपक्रमाचे व जेसीआय भुसावळ ताप्तीच्या सर्व टीमचे कौतुक केले. येणार्‍या काळात मोठ्या प्रमाणात हा उपक्रम घ्यावा ही अपेक्षा व्यक्त केली.

कलागुणांना वाव मिळण्यासाठी प्रदर्शन : रजनी सावकारे
भुसावळ शहरात महिला उद्योजक तयार व्हावेत तसेच त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळावा या उद्देशातून या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आल्याचे क्लबचा अध्यक्षा रजनी सावकारे यांनी सांगितले. प्रदर्शनास भेट देवून भुसावळ शहरातील छोट्या उद्योजकांना प्रोत्साहित करून सहकार्य करावे, असे आवाहन क्लबच्या संपूर्ण सदस्यांकडून करण्यात आले. उपक्रम यशस्वीपणे राबविण्यासाठी प्रकल्प प्रमुख दीपा पटेल, ज्योती दरगड, रीया छाबरा, पिया छाबरा, पल्लवी झोपे, मोनिका अग्रवाल यांनी परीश्रम घेतले. क्लबच्या सदस्य संगीता अग्रवाल, सोनल जवर, आभा दरगड, सुचित्रा अग्रवाल, सुनीता अग्रवाल, वर्षा आहुजा, कोमल आहुजा, कोमल अठवानी, हरमित कौर, ऋचा अग्रवाल, ईशा मनवानी सर्व सदस्य उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !