नवे शैक्षणिक धोरण विद्यार्थ्यांसाठी लाभकारी : प्राचार्य डॉ.रमेश जोशी


भुसावळ : जवळपास 32 वर्षांनी शैक्षणिक धोरणात नवे बदल झालेले आहेत. या धोरणाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे यात विद्यार्थी केंद्र मानून त्याच्या सर्वांगीण विकासाला अधिक महत्व दिले गेल्याचे प्राचार्य डॉ.रमेश जोशी म्हणाले. श्री संत गाडगेबाबा हिंदी महाविद्यालयात नवीन राष्ट्रीय शिक्षा नीती 2020 याविषयी आयोजित कार्यक्रमात बोलतांना ते बोलत होते. डॉ.सुधीर शर्मा यांनी नवीन राष्ट्रीय शिक्षा निती धोरणाविषयी थोडक्यात माहिती दिली. सूत्रसंचालन डॉ.पूनम त्रिवेदी तर आभार प्रा.ज्योती ओस्तवाल यांनी मानले.

जाणीव जागृती मोहिम
संपूर्ण देशात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 चा वार्षिक महोत्सव या आठवड्यात आयोजित केला जात आहे. त्या अनुषंगाने जळगाव येथील श्रम साधना बॉम्बे ट्रस्ट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची माहिती व्हावी व या नवीन शिक्षण पद्धतीत काय बदल आहेत याची त्यांना जाणीव व्हावी म्हणून ‘जाणीव जागृती मोहिम’ आयोजित करण्यात आली. यावेळी अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ.एस.ए.ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आतापासून तयारीला लागा, असा सल्लादेखील दिला. या प्रसंगी डॉ.डी.डी.पुरी तसेच एस.एच.राजपूत यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचविण्याचे आणि अन्य विद्यार्थी व पालकांना यात सहभागी करून घेण्याचे आवाहन केले. या उपक्रमाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जी.के.पटनाईक व उपप्राचार्य डॉ.एस.बी.पवार यांनी समाधान व्यक्त केले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !