मोठा वाघोद्यात अतिक्रमण कायम करण्यासाठी प्रशासनाला निवेदन


रावेर : तालुक्यातील मोठा वाघोदा येथे आरपीआयतर्फे ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढून अतिक्रमण धारकांचे वडिलोपार्जित अतिक्रमण कायम करावे, अशी मागणी निवेदन देवून करण्यात आली. गुरुवारी दुपारी बारा रीपब्लिकन ऑफ इंडियातर्फे ग्रामपंचायतीवर मोर्चा काढण्यात आला. मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यकारी यांना खोटी माहिती देण्यात आली व नागरीकांना हक्कापासून वंचित ठेवणारे वाघोदा बुद्रुक येथील तत्कालीन ग्रामसेवक यांना बडतर्फ करण्यात यावे व अतिक्रमण धारकांचे अतिक्रमण कायम करण्यात यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

यांची निवेदन देताना उपस्थिती
या निवेदनावर रीपाइं जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी, रावेर तालुकाध्यक्ष विक्की तायडे, तालुका सचिव नरेंद्र तायडे, तालुका उपाध्यक्ष किरण ढिवरे, तालुका संघटक भीमराव तायडे, अल्पसंख्यांक तालुका सचिव शेख इकबाल, सामाजिक कार्यकर्ते जय भीम ढाकणे आदींच्या सह्या आहेत. मोर्चाला निंभोरा रोडपासून सुरुवात झाली. हा मोर्चा बस स्थानकमार्गे ग्रामपंचायत कार्यालयावर नेण्यात आला. यावेळी सावदा सहाय्यक निरीक्षक जालिंदर पळे, उपनिरीक्षक विनोद खांडबहाले, विनोद पाटील, विनोद तडवी व होमगार्ड यांनी बंदोबस्त ठेवला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !