माजी मंत्री खडसे बदनामी खटला : अंजली दमानिया गैरहजर
जळगाव : माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची बदनामी केल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या विरोधात अब्रुनुकसानीच्या खटला दाखल असून गुरुवारी न्यायालयात दमानिया गैरहजर राहिल्या तरमुलगा विदेशात जात असल्याने आपण न्यायालयात हजर राहू शकत नसल्याने पुढची तारीख द्यावी, असा विनंती अर्ज त्यांनी वकीलातर्फे सादर केल्याने या खटल्याची आता 4 मार्च रोजी कामकाज होणार आहे. न्या. प्रीती श्रीराम यांच्या न्यायालयात हा खटला सुरू आहे. खडसे यांच्यावतीने अॅड. प्रकाश बी.पाटील तर अंजली दमानिया यांच्यावतीने अॅड.सुधीर कुळकर्णी काम पाहत आहेत.
