रायपूर कंडारी येथे परप्रांतीय तरुणाची आत्महत्या
Suicide of migrant youth in Raipur Kandari जळगाव : रायपूर कंडारी येथे मामांसोबत भाड्याच्या खोलीत राहणार्या व सुपरवायझर म्हणून काम करणार्या तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना जळगाव तालुक्यातील रायपूर कंडारी येथे रविवारी सकाळी आठ वाजता उघडकीला आली. गोविंदकुमार बलराम पासवान (32, दरभंगा, बिहार ह.मु. रायपूर कंडारी, ता.जळगाव) असे मयताचे नाव आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.
रात्रीच्या सुमारास केली आत्महत्या
गोविंदकुमार पासवान हा तरुण आपला मामा अर्जुन कुमार यांच्यासोबत गेल्या सहा महिन्यांपासून जळगाव तालुक्यातील रायपुर कंडारी येथे मोहन परदेशी यांच्या घरात भाड्याच्या खोलीत वास्तव्याला होता. गोविंदकुमार पासवान हा एमआयडीसीतील इंडो ऑईल प्रोटीन फूड या खाींगी कंपनीत सुपरवायझर म्हणून नोकरीला होता. मामा अर्जून कुमार यांची रात्री पाळी असल्याने ते शनिवार, 29 जुलै रोजी रात्री 10 वाजता कंपनीत कामाला निघून आले. त्यानंतर गोविंदकुमार हा घरी एकटाच होता. मध्यरात्री गोविंदकुमार याने छताला दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली. सकाळी आठ मामा अर्जूनकुमार हे घरी आले तेव्हा खोलीचा दरवाजा आतून बंद होता. बराच वेळ प्रतिसाद मिळाला नाही म्हणून त्यांनी खिडकीतून डोकावून पाहिले तर गोविंदकुमार याने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे समोर आले. त्यानंतर शेजारी राहणारे ग्रामस्थ व इतरांना दरवाजा तोडून आत प्रवेश करत मृतदेह खाली उतरवून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी अंती मयत घोषीत केले. आत्महत्या करण्याचे कारण समोर आलेली नाही. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.








