विवर्यातील दोघे तलवारीसह जाळ्यात
Two of the vivaras in a net with swords निंभोरा : विवरा येथील दोघांना तलवार बाळगताना निंभोरा पोलिसांनी पकडल्यानंतर खळबळ उडाली. ही कारवाई सोमवारी रात्री आठ वाजता करण्यात आली. भगवान रामा पाटील (34) व खुशाल विश्वनाथ शिंदे (22, दोन्ही रा.विवरा खुर्द, ता.रावेर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
गोपनीय माहितीवरून कारवाई
विवरा ते रावेर रस्त्यावरील त्रिमूर्ती हॉटेलसमोर संशयित तलवारीच्या धाकावर दहशत निर्माण करीत असल्याची माहिती पोलीस यंत्रणेला मिळाल्यानंतर संशयीतांना ताब्यात घेण्यात आले व त्यांच्याकडील एक हजार रुपये किंमतीची तलवार जप्त करण्यात आली. तपास पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र पाटील करीत आहेत.








