दुचाकीला कट लागल्याचे निमित्त : परप्रांतीय वाहन चालकासह क्लीनरला मारहाण ; जमावाने वाहनाच्या काचाही फोडल्या


Pretext of injury to two-wheeler: beating of cleaner with foreign vehicle driver; The mob also broke the windows of the vehicle सावदा : दुचाकीला कट लागल्याच्या वादातून सात संशयितांसह जमावाने वाहन चालका क्लिनरला बेदम मारहाण केली तसेच चारचाकी वाहनाच्या पुढील बाजूच्या काचा फोडल्या. याप्रकरणी जमाविरोधात दंगलीसह विविध कलमान्वये सावदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

जमाविरोधात गुन्हा दाखल
क्लिनर ईर्शाद नवशाद खान (34, बावडी, खरगोन, जि.मध्यप्रदेश) यांच्या फिर्यादीनुसार, चालक आशिक खानसह ते बोलेरो (एम.पी.46 जी.2858) द्वारे बेकरीचा माल भरून पालमार्गे कोचूरकडे सोमवार, 31 रोजी रात्री आठ वाजता निघाल्यानंतर सावदा येथील बाबूशेठच्या पेट्रोल पंप आवारातील तीन ते चार दुचाकीवरून आलेल्या संशयितांनी दुचाकीला कट मारल्याचे निमित्त करून बेदम मारहाण केली तसेच लोखंडी स्टूल चारचाकी वाहनाच्या काचेवर मारून काचा फोडल्या. तसेच तक्रारदार ईर्शाद व चालक आशिक खान यांना बेदम मारहाण केली. याप्रकरणी महेंद्र पाटील, निशांत पाटील, कन्हैय्या पाटील, पवन सुतार, अविनाश कोळी, मनीष ठाकूर, गौरव पाटील (सर्व रा.कोचूर) व अन्य पाच ते सात अनोळखींविरोधात दंगलीसह हाणामारी व जमावबंदी कायद्याचे उल्लंघण अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक निरीक्षक जालिंदर पळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले करीत आहेत.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !