भुसावळ क्रीडा शिक्षक महासंघातर्फे नगरपालिका मुख्याधिकार्यांचा सत्कार
Bhusawal Municipality Chief Mahesh Waghmode भुसावळ : महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने भुसावळ नगरपालिकेचे मुख्याधिकारी महेश वाघमोडे यांची नाशिक विभागातून अ वर्ग नगरपालिकापदी पदोन्नती झाल्याबद्दल शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान (सत्कार) करण्यात आला.
यांची कार्यक्रमास उपस्थिती
म्युन्सीपल हायस्कूलचे क्रीडा शिक्षक व महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरीक शिक्षण शिक्षक महासंघाचे राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष डॉ.प्रदीप साखरे, दे.ना.भोळे महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्रा.डॉ.संजय चौधरी, महाराणा विद्यालयाचे क्रीडा शिक्षक तथा तालुका समन्वयक राजेंद्र कुलकर्णी, भुसावळ स्पोर्ट्स अॅण्ड रनर्स असोसिएशन व भुसावळ हायस्कूलचे सेवानिवृत्त क्रीडा शिक्षक प्रमोद शुक्ला, सुशीलाबाई चौधरी माध्यमिक विद्यालयाचे क्रीडा शिक्षक सुनील चौधरी आदी उपस्थित होते. याप्रसंगी मुख्याधिकार्यांनी विद्यार्थ्यांच्या खेळण्यासाठी मध्यवर्ती असलेले डी.एस.हायस्कूल मैदान (डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदान) चांगले करण्याचे आश्वासन दिले. क्रीडा क्षेत्रासाठी आपल्याला नवीन अजून काय करता येईल ? हे त्यांनी उपस्थितांकडून जाणून घेतले.

