भुसावळात किरकोळ वादातून तरुणावर चाकूहल्ला
A young man was stabbed in Bhusawal due to a minor dispute भुसावळ : धक्का लागल्याच्या किरकोळ वादातून शहरातील जामनेर रोडवरील आनंद नगराजवळील स्टेट बँकेजवळ तरुणावर चाकूने हल्ला करण्यात आला. ही घटना सोमवार, 31 रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी एकाविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
एकाविरोधात गुन्हा दाखल
अक्षय केशव कासार (29, हुडको कॉलनी, रानातल्या महादेव मंदिराजवळ, भुसावळ) या तरुणाने दिलेल्या तक्रारीनुसार, संशयित चंदू टॅटूवाला उर्फ सी.एम. (पूर्ण नाव नाही) यास तक्रारदाराच्या उजव्या हाताचा धक्का लागल्याच्या वादातून संशयिताने शिविगाळ करीत खिशातील चाकू अक्षयच्या पोटावर व मांडीवर मारून दुखापत केली. याघटनेनंतर जामनेर रोडवर खळबळ उडाली. याप्रकरणी अक्षयच्या तक्रारीवरुन संशयित चंदू टॅटूवालाविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास नाईक निलेश चौधरी करीत आहेत.








