सावखेडासीमला महिलेसह भावाला मारहाण : 12 संशयितांविरोधात दंगलीचा गुन्हा


Savkhedaseem woman and brother beaten up : Riot case against 12 suspects यावल : यावल तालुक्यातील सावखेडासीम येथे 21 वर्षीय महिलेकडे पाहून एकाने वेडे-वाकडे इशारे केले. याबाबत जाब विचारल्याने त्याने व त्याच्या सोबतच्या लोकांनी महिलेसोबत वाद घातला व महिला व तिच्या भावाला 12 जणांनी मारहाण केली तसेच त्यांच्या घरात घुसून घरातील साहित्याची तोडफोड केली. याप्रकरणी यावल पोलिसात 12 जणांविरुद्ध दंगलीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

दंगलीसह विविध कलमान्वये गुन्हा
सावखेडासीम, ता.यावल येथील 21 वर्षीय विवाहिता आपल्या घरी असताना तिच्याकडे काही कारण नसतांना वेडेवाकडे इशारे करून एकाने हावभाव केले. या महिलेच्या भावाने त्याला विचारणा केली असता त्याचा राग येऊन अहमद सलीम तडवी, लादेन मुस्तफा तडवी, असलम अहमद तडवी, इब्राहिम अकबर तडवी, नितीन हैदर तडवी, अकबर नामदार तडवी, सलीम नामदार तडवी, रमजान बिस्मिल्ला तडवी, भुरा गुलशेर तडवी, बिस्मिल्ला तडवी यांचा मुलगा अल्ताफ शावखा तडवी व निसार तडवी या बारा जणांनी या महिलेला शिवीगाळ करून मारहाण केली तसेच तिच्या भावालादेखील मारहाण केली तसेच त्यांच्या घरात घुसून घरातील वस्तूंची तोडफोड करून नुकसान केले. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात 12 जणांविरुद्ध दंगलीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार राजेंद्र पवार करीत आहेत.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !