भुसावळातील चालकाचा मृत्यू : वाहन चालकाविरोधात गुन्हा


Death of a driver in Bhusawal : Crime against the driver भुसावळ : पिंप्रीसेकम शिवारातील काम आटोपून भुसावळकडे दुचाकीने निघालेल्या शहरातील सुधाकर बुधाजी वानखेडे (56, आंबेडकर नगर, भुसावळ) या वाहन चालकाचा कपिलवस्तू नगराजवळ चारचाकी वाहनाच्या धडकेने मृत्यू झाला होता. अपघातप्रकरणी रात्री उशिरा भुसावळ तालुका पोलिसात चारचाकी वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल
भुसावळातील बी.एन.अग्रवाल कॉन्ट्रक्टर्स यांच्याकडे चालक असलेले वानखेडे हे बुधवारी सायंकाळी सहा वाजता दुचाकी (एम.एच.28-4649) पिंप्रीसेकम शिवारातील महामार्गालगतच्या कामावरून ड्यूटी आटोपून भुसावळकडे निघाल्यानंतर कपिलवस्तू नगराजवळ भरधाव होंडा सिटी कार (एम.एच.19 बी.यु.7131) ने धडक दिल्याने वानखेडे यांचा जबर मार बसल्याने जागीच मृत्यू झाला. अपघात प्रकरणी विशाल सुधाकर वानखेडे (36, भुसावळ) यांच्या फिर्यादीवरून कार चालक (नाव गाव माहित नाही) विरोधात भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक सतीश कुलकर्णी करीत आहेत.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !