मध्यरात्री घरातून दोन मोबाईल लांबवले


Two mobile phones were stolen from the house in the middle of the night जळगाव : जळगाव शहरातील गेंदालाल मिल परीसरातील तरुणाच्या घरातून चोरट्याने दोन मोबाईलसह पाच हजारांची रोकड मिळून 30 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल लांबवला. या संदर्भात गुरुवार, 3 ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल
शेख अनवर शेख सईद (24, गेंदालाल मिल, जळगाव) हा तरुण आपल्या परीवारासह वास्तव्याला आहे. हात-मजुरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतो. गुरुवार, 3 ऑगस्ट रोजी रात्री बारा ते पहाटे सहा वाजेच्या दरम्यान त्याच्या घरातून अज्ञात चोरट्याने पाच हजारांची रोकड आणि दोन मोबाईल असा एकूण 30 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला. गुरुवारी तरुणाने जळगाव शहर पोलिसात तक्रार दिली. तपास हवालदार भास्कर ठाकरे करीत आहे.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !