भुसावळातील लॉजमधून मोबाईलसह रोकड लांबवली
The cash along with the mobile phone was recovered from the lodge in Bhusawal सावळ : भुसावळ शहरातील नसरवांजी फाईल भागातील गोल्डन पॅलेस लॉजमधून चोरट्यांनी तीन हजारांची रोकड व तीन हजार रुपये किंमतीचा मोबाईल लांबवल्याची घटना 1 ते 2 दरम्यान घडली. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल
विजय सुरेश गोरे (58, समृद्ध पार्क, सुरभी नगर, भुसावळ) हे भुसावळ शहरातील नसरवांजी फाईल भागातील हनुमान मंदिर परीसराजवळील गोल्डन पॅलेस लॉजवर कामाला आहेत. 1 ते 2 ऑगस्टच्या मध्यरात्री चोरट्यांनी त्यांचा मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण सहा हजारांचा मुद्देमाल लांबवल्याचा प्रकार समोर आला. हा प्रकार घडल्यानंतर विजय गोरे यांनी मोबाईल व रोकडची चौकशी केली परंतु या संदर्भात काहीही माहिती न मिळालयाने त्यांनी गुरुवारी दुपारी एक वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव तक्रार नोंदवली. तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल नेव्हील बाटले करीत आहेत.








