कन्हाळा व किन्ही शिवारातील 87 हजारांचे अॅल्युमिनिअम तार लांबवले
87 thousand aluminum wires in Kanhala and Kinhi Shivara were extended भुसावळ : चोरट्यांनी कन्हाळा व किन्ही शिवारातील दोन ट्रान्सफार्मरला जोडलेले सुमारे 87 हजार रुपये किंमतीचे अॅल्युमिनिअम तार लांबवल्याची धक्कादायक घटना 1 ते 3 ऑगस्ट दरम्यान घडली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर वीज कंपनीने याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल
वीज कंपनीच्या कविता सोनवणे (43, रानातला महादेव, भुसावळ) यांनी भुसावळ तालुका पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, कन्हाळा व किन्ही शिवारात विद्युत कंपनीतर्फे शेतकर्यांना वीजपुरवठा करण्यासाठी डीपी बसवण्यात आली असून या डीपीवरील अनुक्रमे 22 व 65 हजार रुपये किंमतीचे अॅल्युमिनिअम तार चोरट्यांनी संधी साधून लांबवले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर भुसावळ पोलिसात धाचव घेत तक्रार दाखल करण्यात आली. तपास हवालदार गणेश राठोड करीत आहेत.








