जात पंचायतीत न घेतल्याने जळगावात तरुणीने मृत्यूला कवटाळले
जळगाव : कंजरभाट जातीत न घेतल्याने मानसी बागडे या तरुणीने आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. औद्योगिक वसाहत पोलिसांना तरुणीच्या आत्महत्येची माहिती मिळाल्यावर त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी ताब्यात घेतला. त्यानंतर हा प्रकार समोर आला. आत्महत्येनंतर म्हणजेच्या मानसीच्या मृत्यूनंतरही पाझर न फुटलेल्या जातपंचायतीने तिच्या आई वडीलांकडून 20 हजार रुपयांचा दंड वसूल करुन तरुणीचा जातीत समावेश केला व तिच्यावर शुध्दीकरण करून कंजरभाट समाजाच्या रीतीरीवाजाप्रमाणे अंत्यसंस्कार केला.
मृत्यूनंतर तरुणीला जात देवून अंत्यसंस्कार
मानसीच्या मृत्यूनंतरही तिचा कंजरभाट जातीच्या रीवाजानुसार अंत्यसंस्कार करण्यासाठी जातपंचायतीने मानसीचे आई व वडील यांच्याकडून रोख 20 हजार रुपयांचा दंड घेतला. यानंतर जातगंगा देवून तिचे शुध्दीकरण करुन तिला जातीत घेतले. यानंतर समाजाच्या रीरतीरिवाजाप्रमाणे तिच्यावर शुक्रवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात प्रारंभी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी देखील तपास सुरू केला आहे.



